Posts

नाळ : (अनुवादित गोष्ट )

  नाळ अनुवाद : डॉ. नीती बडवे (मूळ पूर्व जर्मन लेखिका: हेल्गा शूबर्ट. जर्मन शीर्षक : Luft und Leben. पूर्व प्रसिद्धी : सत्याग्रही , १९८५.)   ‘ मातृत्वा ’ विषयी माझी कल्पना वेगळी होती. अहं , मी काही माता नव्हते. माझं पोटाचं कातडंच इतकं जाड होतं , त्याखाली मूल वाढावं तरी कसं ? आणि त्यानं माझ्या पोटातून बाहेर याव तरी कसं ? नंतर तर ते आपलं कायमचं असणारच - मला बाहेर जायचं असेल तेव्हा , गावाला जायचं असेल तेव्हा , मनसोक्त झोपायचं असेल , प्रेम करायचं असेल तेव्हाही. पण मी एकोणीस वर्षांचीच असताना गरोदर राहिले. खूप दिवसांपासून ओळख असलेल्या डॉक्टरणीने मला तपासलं आणि ‘दिवस गेले’ असल्याची खात्री दिली. माझा भयभीत चेहरा तिने बघितला आणि म्हणाली , “ तू आजच्या आज आईला सांगितलं नाहीस , तर मी तिला फोन करीन , कोणीही कर्तव्यदक्ष डॉक्टर तुझं अ‍ॅबॉर्शन करणार नाही. ” ती स्वत: कॅथॅलिक होती आणि तिला चार मुलं होती. आमच्याकडे अजून कायद्याने गर्भपात करता येत नव्हता. ज्याने केलं असतं असं कोणी मला माहीत नव्हतं. मुलाच्या बापाचा आजपर्यंत इतक्या अननुभवी मैत्रिणीशी संबंध आलेला नव्हता. त्याने सु...

वाचाकाची परिमिती

वाचाकाची परिमिती आपल्याला माहीत आहे की कोणतीही वापरातली भाषा आपण ऐकत, वाचत , बोलत आणि लिहीत असतो. लहान बाळ ध्वनी ऐकतं आणि मग ते उच्चारण्याचा प्रयत्न करतं. लहान मूल प्रथम अक्षरं बघतं आणि त्याप्रमाणे अक्षर काढण्याचा प्रयत्न करतं.     एखादी नवीन भाषा शिकतांना आपण साहजिकच ती ऐकायला, वाचायला, बोलायला आणि लिहायला शिकतो. त्या भाषेत ऐकणं आणि वाचणं, तसंच बोलणं आणि लिहिणं ही चार कौशल्यं अवगत करून घेतो. त्यात नैपुण्य मिळवतो. ऐकणं आणि वाचणं ही आकलन किंवा ग्रहण करण्यासाठी लागणारी कौशल्यं आहेत. बोलणं आणि लिहिणं ही अभिव्यक्तीसाठी लागणारी म्हणजेच निर्मिती-कौशल्यं आहेत. भाषिक कौशल्यांमध्ये ग्रहण-आकलन कौशल्यांची प्राथमिकता महत्त्वाची आहे. प्रस्तुत लेखाचा विषय आहे ‘वाचक’. ‘वाचका’बद्दल सर्वसाधारणपणे फार कमी बोललं किंवा लिहिलं जातं. ह्या लेखाच्या पहिल्या भागात १९६० नंतरच्या दशकांत ‘वाचन’ आणि ‘वाचक’ याबद्दल युरोपात मांडल्या गेलेल्या काही विचारांचा थोडक्यात परामर्श घेतला आहे. दुस-या भागात आपल्याला परिचित अशा उदाहरणांचा उहापोह केला आहे. दुस-या महायुद्धानंतर १९६० च्या दशकात बहुतांश वसाह...

जर्मन भाषेच्या विकासाची गोष्ट

जर्मन भाषेच्या विकासाची गोष्ट   मराठी भाषेच्या विकासासंबंधी आपण तळमळीनं आणि अहमहमिकेन ं बोलत आणि चर्चा करीत असतो .  ह्या संदर्भात इतरही भाषांची विकासप्रक्रिया जाणून घे णं उद्बोधक ठरेल . भारतात जर्मन भाषा शिकवायला सुरवात झाली, त्याला २०१४ मध्ये शंभर वर्षं झाली. ह्या शताब्दी वर्षाच्या निमित्तानं जर्मन भाषेच्या विकासाच्या प्रक्रियेवर एक अगदी छोटा लेख लिहिला होता. (सप्तरंग, सकाळ पुरवणी २६ जानेवारी २०१४). इथे जरा विस्तारित मांडणी केली आहे. आधुनिक जर्मन भाषेचा का ळ   मार्टीन लूथरने केलेल्या बायबलच्या जर्मन भाषांतरापासून म्हणजे सोळाव्या शतकाच्या मध्यापासून धरतात . इतर युरोपीय भाषांच्या तुलनेत ह्या काळात जर्मनला कुठेही फा रशी पत किंवा प्रतिष्ठा नव्हती . ह्या संदर्भात स्पेनचा राजा पाचवा चार्ल्स ( १५०० - १५५८ ) ह्याने केलेली टिप्पणी अनेकदा उद्धृत केली जाते - " मी देवाशी स्प ॅ निश बोलतो , बायकांशी इटालियन , पुरुषांशी फ्रेंच आणि माझ्या घोड्यांशी जर्मन बोलतो ." त्या काळी लोक जर्मन भाषेची भरपूर टर उडवायच...