Posts

भाषा शिक्षण कशासाठी?

  भाषा शिक्षण कशासाठी ?  डॉ. नीती बडवे (आजचा सुधारक, जुलै-ऑगस्ट २००२, पान १६७-१७०)  भाषेची गोष्ट ‘अति परिचयात्...’ अशी आहे. एक तरी भाषा प्रत्येकाला अवगत असते. म्हणून तिच्याबद्दल कोणी स्वतंत्रपणे विचारच करत नाही. भाषा ही गोष्ट आपल्या अवयवांसारखी आपण गृहीत धरतो. आपल्याला हात असतात , पाय असतात , तशी आपली एक भाषही असते. भाषाक्षमता उपजत असते , पण भाषा उपजत नसते. पहिली भाषा माणूस सहज शकतो , इतकी सहज , की आपण ती प्रयत्नपूर्वक शिकलो आहोत , हेच त्याला जाणवत नाही. भाषा , विशेषत: स्वभाषा किंवा मातृभाषा आपल्याला ‘आपोआप’ येते , अशी एक समजूत असल्यामुळे पुढे ‘मातृभाषा कशाला शिकायची ? ’ ‘मातृभाषेचे कोश कशाला पाहिजेत ? ’ असे प्रश्न माणसाला पडतात. भाषेत शिकण्यासारखे खूप काही आहे , याचीच आधी नव्याने जाणीव करून घ्यायला पाहिजे. ‘भाषा शिकणं’ म्हणजे केवळ शब्द , व्याकरण शिकणं , असा अर्थ होत नाही. किंवा भाषा शिकणं , म्हणजे त्या भाषेतलं ललित साहित्य शिकणं किंवा साहित्याचा अभ्यास करणं , असाही होत नाही. आपण एकदा थोड्या अंतरावरून भाषेकडे बघितले तर आपल्या लक्षात येते , की ‘भाषा’ हातापाय...

अजब न्याय वर्तुळाचा चिं. त्र्यं. खानोलकर तीन पैशांचा तमाशा पु. ल. देशपांडे

  अजब न्याय वर्तुळाचा चिं. त्र्यं. खानोलकर तीन पैशांचा तमाशा पु. ल. देशपांडे आलोचना : जुलै १९७९, २०-२७ बेर्टोल्ट ब्रेश्त् हा विसाव्या शतकांतील एक विवाद्य जर्मन लेखक आहे. त्याच्या राजकीय प्रेरणा आणि त्यांचे साहित्यांतील अभिनव प्रयोग हे एकमेकांशी निगडितच आहेत. ‘ वाचक ’ व ‘ प्रेक्षक ’ यांच्याबद्दलच्या त्याच्या कल्पना व अपेक्षा अपारंपारिक आहेत. त्यामुळे त्याच्या साहित्याने सर्व जागेचच लक्ष वेधून घेतले आहे. मराठीत रूपान्तरित झालेल्या त्याच्या दोन नाटकांची मूळ जर्मन नाटकांशी तुलना , हा प्रस्तुत विषय आहे. ब्रेश्तच्या ‘कॉकेशियन चॉक सर्कल’ ( der kaukasische Kreidekreis) या नाटकाचे चिं. त्र्यं. खानोलकरांनी केलेले ‘अजब न्याय वर्तुळाचा’ हे एक रूपांतर व ‘थ्री पेनी ऑपेरा’ ( Drei Groschen Oper) या नाटकाचे पु. ल. देशपांडे यांनी केलेले ‘तीन पैशांचा तमाशा’ हे दुसरे रूपांतर. प्रस्तुत तुलना नाट्यप्रयोगांची नसून केवळ संहितांची आहे. तरीहि ब्रेश्तच्या रंगभूमीच्या किंवा नाट्याबद्दलच्या कल्पना व त्याच्या नाटकांचे उद्देश प्रथम समजून घेणे आवश्यक आहे. दोन्ही नाटकांचे मूळ विषय ब्रेश्तचे नाही...