जर्मन भाषेच्या विकासाची गोष्ट
जर्मन भाषेच्या विकासाची गोष्ट मराठी भाषेच्या विकासासंबंधी आपण तळमळीनं आणि अहमहमिकेन ं बोलत आणि चर्चा करीत असतो . ह्या संदर्भात इतरही भाषांची विकासप्रक्रिया जाणून घे णं उद्बोधक ठरेल . भारतात जर्मन भाषा शिकवायला सुरवात झाली, त्याला २०१४ मध्ये शंभर वर्षं झाली. ह्या शताब्दी वर्षाच्या निमित्तानं जर्मन भाषेच्या विकासाच्या प्रक्रियेवर एक अगदी छोटा लेख लिहिला होता. (सप्तरंग, सकाळ पुरवणी २६ जानेवारी २०१४). इथे जरा विस्तारित मांडणी केली आहे. आधुनिक जर्मन भाषेचा का ळ मार्टीन लूथरने केलेल्या बायबलच्या जर्मन भाषांतरापासून म्हणजे सोळाव्या शतकाच्या मध्यापासून धरतात . इतर युरोपीय भाषांच्या तुलनेत ह्या काळात जर्मनला कुठेही फा रशी पत किंवा प्रतिष्ठा नव्हती . ह्या संदर्भात स्पेनचा राजा पाचवा चार्ल्स ( १५०० - १५५८ ) ह्याने केलेली टिप्पणी अनेकदा उद्धृत केली जाते - " मी देवाशी स्प ॅ निश बोलतो , बायकांशी इटालियन , पुरुषांशी फ्रेंच आणि माझ्या घोड्यांशी जर्मन बोलतो ." त्या काळी लोक जर्मन भाषेची भरपूर टर उडवायच...