अजब न्याय वर्तुळाचा चिं. त्र्यं. खानोलकर तीन पैशांचा तमाशा पु. ल. देशपांडे
अजब न्याय वर्तुळाचा चिं. त्र्यं. खानोलकर तीन पैशांचा तमाशा पु. ल. देशपांडे आलोचना : जुलै १९७९, २०-२७ बेर्टोल्ट ब्रेश्त् हा विसाव्या शतकांतील एक विवाद्य जर्मन लेखक आहे. त्याच्या राजकीय प्रेरणा आणि त्यांचे साहित्यांतील अभिनव प्रयोग हे एकमेकांशी निगडितच आहेत. ‘ वाचक ’ व ‘ प्रेक्षक ’ यांच्याबद्दलच्या त्याच्या कल्पना व अपेक्षा अपारंपारिक आहेत. त्यामुळे त्याच्या साहित्याने सर्व जागेचच लक्ष वेधून घेतले आहे. मराठीत रूपान्तरित झालेल्या त्याच्या दोन नाटकांची मूळ जर्मन नाटकांशी तुलना , हा प्रस्तुत विषय आहे. ब्रेश्तच्या ‘कॉकेशियन चॉक सर्कल’ ( der kaukasische Kreidekreis) या नाटकाचे चिं. त्र्यं. खानोलकरांनी केलेले ‘अजब न्याय वर्तुळाचा’ हे एक रूपांतर व ‘थ्री पेनी ऑपेरा’ ( Drei Groschen Oper) या नाटकाचे पु. ल. देशपांडे यांनी केलेले ‘तीन पैशांचा तमाशा’ हे दुसरे रूपांतर. प्रस्तुत तुलना नाट्यप्रयोगांची नसून केवळ संहितांची आहे. तरीहि ब्रेश्तच्या रंगभूमीच्या किंवा नाट्याबद्दलच्या कल्पना व त्याच्या नाटकांचे उद्देश प्रथम समजून घेणे आवश्यक आहे. दोन्ही नाटकांचे मूळ विषय ब्रेश्तचे नाही...