Posts

अजब न्याय वर्तुळाचा चिं. त्र्यं. खानोलकर तीन पैशांचा तमाशा पु. ल. देशपांडे

  अजब न्याय वर्तुळाचा चिं. त्र्यं. खानोलकर तीन पैशांचा तमाशा पु. ल. देशपांडे आलोचना : जुलै १९७९, २०-२७ बेर्टोल्ट ब्रेश्त् हा विसाव्या शतकांतील एक विवाद्य जर्मन लेखक आहे. त्याच्या राजकीय प्रेरणा आणि त्यांचे साहित्यांतील अभिनव प्रयोग हे एकमेकांशी निगडितच आहेत. ‘ वाचक ’ व ‘ प्रेक्षक ’ यांच्याबद्दलच्या त्याच्या कल्पना व अपेक्षा अपारंपारिक आहेत. त्यामुळे त्याच्या साहित्याने सर्व जागेचच लक्ष वेधून घेतले आहे. मराठीत रूपान्तरित झालेल्या त्याच्या दोन नाटकांची मूळ जर्मन नाटकांशी तुलना , हा प्रस्तुत विषय आहे. ब्रेश्तच्या ‘कॉकेशियन चॉक सर्कल’ ( der kaukasische Kreidekreis) या नाटकाचे चिं. त्र्यं. खानोलकरांनी केलेले ‘अजब न्याय वर्तुळाचा’ हे एक रूपांतर व ‘थ्री पेनी ऑपेरा’ ( Drei Groschen Oper) या नाटकाचे पु. ल. देशपांडे यांनी केलेले ‘तीन पैशांचा तमाशा’ हे दुसरे रूपांतर. प्रस्तुत तुलना नाट्यप्रयोगांची नसून केवळ संहितांची आहे. तरीहि ब्रेश्तच्या रंगभूमीच्या किंवा नाट्याबद्दलच्या कल्पना व त्याच्या नाटकांचे उद्देश प्रथम समजून घेणे आवश्यक आहे. दोन्ही नाटकांचे मूळ विषय ब्रेश्तचे नाही...

भाषा, भूगोल आणि भाषांतर

भाषा , भूगोल आणि भाषांतर नीती बडवे. भाषा आणि जीवन, १०:३, पावसाळा १९९२, पान ५१-५७ भाषांतरकाराची भूमिका भाषांतर म्हटले , की भाषांतरकाराची मध्यस्थाची भूमिका डोळ्यांसमोर येते. तो केवळ दोन भाषांमध्येच नव्हे , तर दोन भाषासमाजांमध्ये दोन संस्कृतीमध्ये मध्यस्थी   करत असतो. काही भाषा त्यांच्या जडणघडणीच्या दृष्टीने किंवा त्यांच्या संस्कृतीच्या दृष्टीने एकमेंकाशी अधिक साधर्म्य असलेल्या किंवा एकमेकींशी दीर्घपरिचित असतात ; आणि त्यांच्यात माषिक सांस्कृतिक देवाणघेवाण मोठ्या प्रमाणावर घडत असते. उदारणार्थ , भारतीय भाषा: मराठी-कानडी , मराठी -गुजराती , पंजाबी-हिंदी , इत्यादी. परंतु काही भाषासमाज मात्र एकमेकांपासून भौगोलिकदृष्ट्या दूर आणि सांस्कृतिकदृष्ट्या अधिक परके असतात. त्यांच्यांत विपुल देवाणघेवाणही होत नसते. ते भाषासमाज एकमेकांना बरेच अपरिचित राहतात. मराठी-जर्मन या भाषांचा संबंध असा आहे. अशा रीतीने भिन्न संस्कृतीच्या पार्श्‍वभूमीवर विकसीत होणार्‍या दोन भाषांमध्ये मध्यस्थी करणार्‍या भाषांतरकाराची भूमिका काय असते ? भाषांतरकाराच्या दोन्ही भाषांशी आणि भाषासमाजांशी निकटचा संबंध असतो. ...